प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यातील विद्यार्थ्यांना शशिकांत केळशीकर यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप
भाजपा काजू महामंडळ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रुपेश बेलोसे यांची उपस्थिती
दिवा : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिवा परिसरातील विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम भाजपा काजू महामंडळ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रुपेश बेलोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा कार्यक्रम महाराष्ट्र भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ठाणे जिल्हा सरचिटणीस, ह्युमन राईट्स राष्ट्रीय सरचिटणीस तसेच टायगर ग्रुप ठाणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत (सतीश) केळशीकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले वह्या व शैक्षणिक साहित्य यावेळी वितरित करण्यात आले.
तेथे उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण हेच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना सातत्याने मेहनत करण्याचे आवाहन केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी उपस्थिती कोकण प्रतिष्ठान दापोली खेड मंडणगड अध्यक्ष तुषार गायकर, उपाध्यक्ष दिलीप शिगवण, सल्लागार गणेश दवंडे, तसेच भाजपा सदस्य साधना सिंग जी, पूनम सिंग व टायगर ग्रुप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भोईर काका, दिवा शहर उपाध्यक्ष कैलास गोगावले, रमेश कोळी, कु. सूरज पानसरे व सर्व सहकारी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले असून, अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
