२ फेब्रुवारीला मलंगबाबा वार्षिक पालखी सोहळा
भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – गोपाळ लांडगे
डोंबिवली, दि. 28 जानेवारी (आरती परब) : २७ जानेवारीला, श्री मलंगड यात्रा निमित्त कल्याण पश्चिमेतील ९ नेक्स्ट बैंक्वेट हॉल, साई पार्क स्ट्रीट कमर्शियल संकुल, येथे शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, हे उपस्थित होते.
या वेळी बोलताना गोपाल लांडगे यांनी सांगितले की, मलंग स्थान हे रिवाजा प्रमाणे बघता संपूर्ण स्थान हिंदूंच आहे. यावर अतिक्रमण केलेले आहे. कारण येथिल मानकरी हा हिंदूच आहे, पुजारी हिंदू आहे, पालखीचे भोई हिंदू आहे, मशाल धरणारे हिंदू आहेत, पालखी बरोबर डोक्यावर दिवे घेऊन जाणारे हिंदू आहेत, दरवर्षी येथे श्रीराम नवमी, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, ललित पंचमी, कृष्ण जन्मोत्सव, दिवाळी पाडवा, वर्षाच्या साऱ्या पोर्णिमा साजऱ्या केल्या जातात. मात्र देवस्थानाची नोंदणी करताना “पीर हाजी मलंग साहेब दर्गा ट्रस्ट” नावाने नोंदवले गेले आहे. या प्रकरणातील दावे हायकोर्टात न्याय प्रविष्ट असून तेथे, ॲड. नितीन प्रधान हे कामकाज पाहतात, तर ठाणे कोर्ट येथे १९८२ पासून केस सुरू आहे. धर्मदाय आयुक्त येथील कामकाज ॲड. मुधोळकर व पुण्याचे व पुण्याचे मदन बलखवडे हे पाहतात. त्याचप्रमाणे वफबोर्ड मध्ये झालेला वाद सुटला आहे. मात्र विरोधक आपिलात गेल्यामुळे तेथील वाद संभाजीनगर येथे ॲड. देशपांडे पाहतात. या यात्रेचे नियोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे, तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षीप्रमाणे मलंग बाबा पालखी सोहळा संपन्न होणार आहे.
१९७८ सालापासून सुरू झालेला हि यात्रा विशेषतः १९८६ पासून आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मलंग मुक्तीचा लढा सुरू आहे. जसा न्यायालयीन लढा सुरू आहे. त्याच प्रमाणात जनजागृती करून हिंदूंची वहिवाट तीच मलंग मुक्तीची पहाट या घोषणेप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार सुरू झालेल्या या कार्यक्रमला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं गोपाळ लांडगे यांनी सांगितले. तर जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी २ फेब्रुवारीला या यात्रेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मलंगबाबाच्या समाधीची आरती करण्यात येणार आहे. तर रात्री ७ वाजता जोशी बाग (मलंगडच्या पायथ्याशी) शिवसेना बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते जमून मलंग गडावर होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी जातील. रात्रीचा पालखी सोहळा सकाळी गंधलेपण व ६ फेब्रुवारी श्री मलंग बाबाचे वार्षिक स्नान सोहळा होईल. या स्नान सोहळ्यात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी नाव नोंदणी करून घ्यावी. सर्व हिंदू विधी प्रमाणे हिंदू प्रतिनिधी पूजा करून उत्साह साजरा केला जाईल. भाविकांना मलंग गडावर जाण्यासाठी फॅनिक्युलरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यामुळे मलंग गडावर येण्या जाण्यासाठी सोप होणार आहे.
