हा निव्वळ अपघात, राजकारण नको– शरद पवार

बारामती : “हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. पण, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. ही घटना निव्वळ अपघात आहे. यात कोणतेही राजकारण करू नये,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली.

हेलिकॉप्टरमधून बारामती विमानतळावर उतरताच त्यांनी सर्वप्रथम उपस्थित अधिकाऱ्यांकडे आणि कर्मचाऱ्यांकडे “विमान कसं आणि कुठं कोसळलं?” असा प्रश्न विचारला. विमानतळाच्या धावपट्टीचा शेवट जिथे होतो त्या भागापासून सुमारे एक किलोमीटरच्या परिसरात हा अपघात झाला. धावपट्टीलगतच्या खोलगट भागात विमान कोसळल्याची माहिती शरद पवारांना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *