राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली
मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार 30 जानेवारीला विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व डॉ. विलास आठवले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच, याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र विधिमंडळाचे सह सचिव नागनाथ थिटे, सह सचिव (समिती) राजेश तारवी, उप सचिव  विजय कोमटवार, स्वाती ताडफळे, अवर सचिव सुरेश मोगल, उप सभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *