राष्ट्रीय बॅडमिंटन पंच प्राचार्य चित्ते सर यांचे निधन

पुणे – चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर वामन चित्ते यांचे वयाच्या ८9 व्या वर्षी पुणे येथे दुःखद निधन झाले.  महाविद्यालयाच्या सुरुवातीपासूनचे  कॉमर्स विषयाचे प्राध्यापक  आणि महाविद्यालयाचे  १९७३ पासून ते १९९७ पर्यंत प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते.

कुशल प्रशासक, हाडाचे कर्तव्य तत्पर शिक्षक, खिलाडू वृत्तीचा शिस्तप्रिय खेळाडू, बुद्धिमान अर्थतज्ञ,  राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनचे पंच, तसेच चाळीसगाव सारख्या ग्रामिण भागातील तालुक्यातून आपल्या परिसस्पर्शातून ४५/५० वर्षा पुर्वी  त्यांनी  सुजाता देव, मिलींद घाटे, विवेक जोशी व मिलींद पूर्णपात्रे या सोन्यासारखे आतंरराष्टीय खेलाडू घडविले जे अजूनही खेळत आहेत व चालीसगावच नाव खेलाडू जगातात चमकावण्यात सराचा फार मोठा वाटा आहे.चित्ते सर वयाच्या ८३ वयापर्यंत पुणे येथे  ५० च्या आसपास मुलामुलींना बॅडमिंटन चे  प्रशिक्षण देत असत.    एक सहृदय पालक, आदर्श पिता, आदर्श शिक्षक, आदर्श मित्र, आदर्श खेळाडू असं बहुगुणी, बहूआयामी व्यक्तिमत्व आज हरवलं.

चित्ते आणि कोतकर कुटुंबीय दुःख सागरात बुडाले ,त्यांच्या जाण्याने या क्षेत्रात झालेली पोकळी कधी भरून निघणार नाही असे आदर्श बहुगुणी माणसं आज दुर्मिळ ! सरांच्या जाण्याने चित्ते कुटुंबीयांवर झालेला आघात सहन करण्याची शक्ती त्यांना मिळावी ही चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व आजी-माजी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून दुःखद सहवेदना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *