सुजाता पाटील
नवी मुंबईच्या
महापौर होणार
नवी मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्याशी दोन हात करून नवी मुंबईत एकहाती सत्ता आणणाऱ्या वन मंत्री गणेश नाईक यांनी धक्कातंत्राचा वापर करीत नेरुळ लगत असलेल्या सारसोळे गावातील कडवे समर्थक सुरज पाटील यांच्या पत्नी नगरसेविका सुजाता पाटील यांची महापौर पदासाठी निवड केली आहे. अभ्यासू आणि आक्रमक अशी प्रतिमा असणारे सूरज हे नाईक कुटुंबियांचे निष्ठावान मानले जातात. तसेच भाजपचा नवी मुंबईतील तरुण आघाडीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते.
गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली १११ जागा असलेल्या नवी मुंबई महापालिकेत भाजपचे ६५ तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ४२ नगरसेवक निवडून आले. बहुमतासाठी आवश्यक असलेला ५६ चा आकडा भाजपने सहज ओलांडला आहे.
यंदाचे महापौर पद महिलांसाठी राखीव असल्याने नाईक यांचे पुतणे सागर नाईक हे या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले होते.
