बी. के. बिर्ला महाविद्यालयात नव साहित्यिकांचा सन्मान
कल्याण: बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे पुरस्कृत साहित्य भारती प्रांत यांनी कोंकण प्रांतातील नवलेखक व साहित्य अभ्यासक यांच्या सन्मानार्थ आयोजित समारंभ यशस्वीपणे पार पडला. या सन्मानासाठी कोकण प्रांतातील शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी त्रिस्तरीय — त्रिभाषिक नवलेखक शोध निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी १२७ शैक्षणिक संस्थांकडून हिंदी, इंग्रजी आणि मराठीत एकूण १५८७ निबंध प्राप्त झाले. पात्र परीक्षकांच्या मूल्यमापनानंतर एकूण ६९ विद्यार्थ्यांची पारितोषिकांसाठी निवड करण्यात. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
सन्मान समारंभाचे मुख्य पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक इंदुशेखर तत्पुरुष (जयपूर) उपस्थित होते. त्यांनी स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या ‘पर्यावरण संरक्षणात आपली भूमिका’, ‘वर्ष २०४७पर्यंत भारत कसा विकसित होईल’ आणि ‘स्वदेशी स्वीकारा: आत्मनिर्भर भारत घडवा’ या तीन विषयांबाबत आपले विचार मांडले. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. दिनेशप्रताप सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांनी नवसाहित्यिकांसाठी आशा कार्यक्रमांचीअत्यंत आवश्यकताअसल्याचे सांगत यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मुख्य अतिथी म्हणून उपस्थित महाराष्ट्र राज्य गृह रक्षक दलाचे सहायक संचालक विजयकुमार कलवले यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना नेहमी प्रश्न उपस्थित ठेवण्याचे आणि ‘स्क्रोल’च्या बदल्यात ‘स्कॉलर’ बनण्याचे महत्व सांगितले. प्रमुख उपस्थित डॉ. बलिराम गायकवाड यांनी मानवी जीवनातील साहित्याच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडण्याचे आवाहन केले. सन्मानित अतिथी दुर्गेश सोनार यांनी या सन्मान समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत साहित्यातील नैतिकता आणि राष्ट्राबद्दलचे योगदान यावर भर दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  समन्वयक डॉ. श्यामसुंदर पांडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *