बैठकीत नसणाऱ्यांना विलिनिकरणाचे कसे कळणार- शरद पवार
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरणाबाबतच्या बैठकीत नसणाऱ्यांना या बद्दल काय माहित असणार असा सवाल राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी कोणतीही कल्पना जेष्ठ नेते शरद पवार यांना दिली नाही, असे स्वत: शरद पवार यांनी म्हटले होते. यावर त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. १२ फेब्रवारी २०२६ रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबद्दल घोषणा केली जाणार होती. मात्र, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलताना स्पष्ट सांगितले की, अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती.
शरद पवार यांनी पत्रकारांसोबत अनाैपचारिक चर्चा करत असताना म्हटले की, या विलगीकरणाच्या चर्चेत जे कोणी सहभागी नव्हते, त्यांना या संदर्भात कशी काय माहिती असणार. शरद पवार यांनी अगोदरच स्पष्ट केले होते की, या विलिनीकरणाच्या मुद्द्यात स्वत: अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवार हे सहभागी होते. असेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
