मुंढवा जमीन गैरव्यवहार पार्थ पवारांना ‘क्लीनचीट’?

 पोलिसांची चार्जशीट सादर

फक्त शीतल तेजवानी आरोपी

पार्थ पवारांचे नाव वगळले

पुणे: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी प्राथमिक चौकशीतच पार्थ पवारला क्लीन चीट दिली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणा शीतल तेजवाणीला मुख्य आरोपी करून तीच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात १८८६ पानांचे विस्तृत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.

अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशातच या मुंढवा गैरव्हवहार प्रकरणात पोलिसांच्या चार्जशीटमध्ये त्यांचे नाव न आल्याने पार्थ यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.  या दोषारोपपत्रामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नसल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केली होती. त्यानंतर लगेचच पोलिसांनी ही मोठी कारवाई करत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *