ओलेक्ट्राने तिसऱ्या तिमाहीमध्ये ३८५ इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्स वितरीत केले.
मुंबई: भारतातील अग्रणी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने (OGL) तिसऱ्या तिमाहीमध्ये ३८५ इलेक्ट्रिक वाहने वितरीत केली आहेत, जी मागील वर्षीच्या तुलनेत ३७% अधिक आहे. कंपनीचा राजस्व २९% वाढून ₹६६३.६० कोटी इतका झाला आहे.
ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे प्रबंध निदेशक महेश बाबू म्हणाले, “एका तिमाहीमध्ये सर्वाधिक ३८५ इलेक्ट्रिक वाहने वितरीत केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. BEST आणि MTCच्या बस सर्वाधिक या आमच्या आहेत. प्रवाशांना या गाड्या आवडत आहेत. आम्ही स्वच्छ आणि शाश्वत परिवहन प्रणाली राबवण्यात अग्रणी भूमिका निभावत आहोत.” ओलेक्ट्राच्या इलेक्ट्रिक बस BEST आणि MSRTCमध्ये यशस्वीपणे चालवल्या जात आहेत.
