केडीएमसी प्रशासनाने आश्वासनांची पुर्तता न केल्याने आझाद मैदानात उपोषणाचा इशारा
सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे यांचे मुख्य सचिवांना पत्र
कल्याण: नागरिकांच्या सुविधांच्या प्रश्नांवर १२ डिसेंबर २०२२ आणि १४ जानेवारी २०२५ रोजी आंदोलन दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न केल्यामुळे १५ फेब्रुवारी पासून जनहितार्थ आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी दिला आहे.
नागरिकांच्या मुलभूत गरजांसाठी व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारा विरोधात महापालिका मुख्यालय समोर अनेक वेळा आंदोलन करून तसेच महापालिका प्रशासनाकडून आंदोलन समाप्त करावे म्हणून दिलेल्या आश्वासनावर आजपर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही, तरी संबंधित विषयाला आमच्या पुढील मागण्या मान्य होईपर्यंत आमचा १५ फेब्रुवारीपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण साठी बसणार असल्याचे साळवे यांनी सांगितले.
