इंधन वाचवा हरित ऊर्जा वापरा देशाला वाचवा
रमेश औताडे
मुंबई : सार्वजनिक परिवहन सेवा वापर करा व इंधन वाचवा असे आवाहन करत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हरित ऊर्जा वापरण्याचे व पर्यावरण रक्षण करण्याचे आवाहन सक्षम २०२५ – २६ (संरक्षण क्षमता महोत्सव ) या देशातील ऑइल  कंपन्याच्या जनजागृती कार्यक्रमात रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे केले.
या कार्यक्रमाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे जीवाश्म इंधनावरील वाया जाणारा खर्च रोखणे, परकीय तिजोरीवरील बाडता भार कमी करणे आणि जीवाश्म इंधन जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने समर्थनाने जनजागृती पसरविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतात. सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) २०२५-२६ हे १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले जातील, संपूर्ण देशभर ज्याची टॅगलाइन “कन्सर्व ऑइल अँड गॅस, गो ग्रीन” अशी असेल.
१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत तेल विपणन कंपन्या (ओएमसी) राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी वर्तनात्मक बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे असे महाराष्ट्र कार्यक्रम समन्वयक दिपक वाघ यांनी सांगितले.
उमेश विलास कुलकर्णी, राज्यस्तरीय समन्वयक (पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू), महाराष्ट्र, थॉमस जेम्स, प्रमुख रिटेल (पश्चिम), बीपीसीएल, मिहिर जोशी, राज्य प्रमुख (रिटेल), एमएच-१ आणि गोवा, बीपीसीएल, वरुण कुमार, उपमहाव्यवस्थापक ऑपरेशन्स पश्चिम विभाग, एचपीसीएल, देवांशु मिश्रा महाव्यवस्थापक ल्युब्स, आयओसीएल, जितेंद्र गुप्ता, महाव्यवस्थापक (विपणन), गेल इंडिया लिमिटेड यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *