डोंबिवली पश्चिमेतील कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याकडे भाजपाने वेधले लक्ष
पाणीपुरवठा नियमित करण्याची प्रकाश भोईर यांची  मागणी
कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील काही प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून याकडे भारतीय जनता पार्टीने लक्ष वेधले आहे. माजी नगरसेवक तथा भाजपाचे प्रकाश भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र देऊन जास्त दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
डोंबीवली पश्चिमेतील प्रभाग क्र २२ सहयाद्री नगर, राजूनगर, सरोवर नगर, गरिबाचा वाडा, साई नगर, शंकेश्वर नगर तसेच महालक्ष्मी चौक, या परिसरामध्ये बऱ्याच प्रमाणावर पाणी पुरवठा कमी दाबाने येत असून काही ठिकाणी दिवसातून एका तासापेक्षा कमी पाण्याचा वेळ मिळत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे. तसेच केडीएमसीचा टैंकर पुरवठा वेळेवर व पुरेसा होत नसल्याने दोन-अडीच हजार रु. देऊन खाजगी टैंकर आणावे लागतात. काही ठिकाणी दुपारच्या वेळेत पाणी असल्याने गृहिनींना घरची काम आटपून मुलांना शाळेत सोडणे तसेच बाकीच्या दैनंदीन कामातून वेळ काढणे कठीण होते.
शासनाच्या माध्यमातून अमृत योजनेतून राजू नगर व गरिबाचा वाडा या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम अत्यंत प्रकाश धिम्या गतिने सुरू असल्याने भविष्यात हे काम कधी होईल हे सांगता येत नाही. तसेच हे झाले तरी डोबिंवली पश्चिमेला ह्या टाक्या भरण्यासाठी माझ्या माहिती प्रमाणे तशी वितरण व्यवस्थेला डोंबिवली पश्चिमेला अधिकची व्यवस्था करण्यासाठी जल वाहिन्यांची वितरण व्यवस्था दिसून येत नाही. तरी या  परिसरातील पाणी पुरवठा व्यवस्थित होई पर्यंत नागरिकांना त्यांच्या मागणी नुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर जास्त वाढवून नियमित व महापालिकेच्या दरात देण्याची व्यवस्था करावी शक्य असल्यास मोफत देण्याची मागणी भोईर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *