मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन
मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यानशिवाजी पार्क, दादर येथील महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट अँड गाईड हॉलमध्ये ३३ व्या वरिष्ठ मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष वयस्कर एकेरी (५० वर्षावरील ), महिला वयस्कर एकेरी (५० वर्षावरील), आंतर कचेरी व आंतर क्लब अशा एकंदर सहा गटांमध्ये हि स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येईल. मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या क्लब मार्फत नावे स्वीकारली जाणार असल्याने खेळाडूंनी त्वरित आपल्या क्लबशी संपर्क साधावा. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, शिवाजी पार्क, मुंबई येथे उपलब्ध असून दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान नावे स्वीकारली जातील. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *