कल्याणामध्ये रंगणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’  शरीरसौष्ठव स्पर्धा
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विजय साळवी यांच्या आयोजनाखाली होणार भव्यदिव्य स्पर्धा
कल्याण : हिंदुस्तानातील तमाम हिंदुप्रेमी नागरिकांचे आराध्य दैवत असणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण शहर शिवसेना शाखेने शरीर सौष्ठव स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन केले आहे. या स्पर्धेत कोण होणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’ चा मानकरी हे पाहणे मात्र उत्सुकतेचे ठरणार आहे.
शिवसेना उपनेते विजय साळवी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण शहर शाखा यांच्या वतीने “हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’ ही शरीरसौष्ठव स्पर्धा शुक्रवार ६ फेब्रुवारीला  सायंकाळी ६ वाजता कल्याणमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड) संतोषी माता मंदिर रोड, कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेस ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनची मान्यता आहे. या स्पर्धेला कल्याणकर क्रीडाप्रेमींनी व खेळाडूंनी तसेच निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, कल्याण पश्चिम व मुरबाड जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, कल्याण पश्चिम शहरप्रमुख बाळा परब, कल्याण पश्चिम विधानसभा संघटक किशोर शुक्ला आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *