प्रफुल पटेलांची मोदी-शाहांशी

बंद दारा आड चर्चा

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीतून माघार

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणास भाजपचा विरोध

नवी दिल्ली : अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाबाबत उलटसुलट दावे दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभुमीवर राष्टवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची बंद दारा आड भेट घेतली. याबैठकीत एकत्रिकरणावर चर्चा झाल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाला भाजपाचा विरोध आहे. दरम्यान नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीतून आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले.

आमचा पक्ष लोकशाही पद्धतीन चालतो. मी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष आहे. सुनील तटकरे हे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षाबाबतची जबाबदारी आम्ही पाडत होतो. अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी कुणाची निवड करायची हे पक्ष ठरवेल पण मी स्वता या निवडीतून माघार घेतोय असे आज प्रफुल पटेल यांनी जाहीर केले. तसेच राज ठाकरे यांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कुणीही मराठी चाले पण पटेल नको या व्टिटचा समाचार घेताना राज ठाकरे आमच्या पक्षाबाबत भाष्य कसे काय करू शकतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान , अजित पवार यांचे विधी पार पडल्यानंतर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिल्लीला घेऊन या असे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पटेल यांना दिल्याचे समजते.

दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे आणि बीडच्या पालकमंत्रिपदी सुनेत्रा पवारांची निवड करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *