भारताचा व्यापार कराराचा विक्रम !
एका वर्षात विक्रमी ५ व्यापार करार
जागतिक जीडीपीत ५० टक्क्यांहून अधिक भागिदारी
नवी दिल्ली : भारताने यंदाच्या एका वर्षात तब्बल पाच व्यापार करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतानं काही दिवसांपूर्वी यूरोपियन यूनियन सोबत मदर ऑफ ऑल डील्स नावाच्या व्यापार कराराची घोषणा केली होती. त्यानंतर काहीच दिवसात भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. तसेच भारतानं त्यापूर्वी ब्रिटन, ओमान आणि न्यूझीलंड सोबत व्यापार करार केले आहेत. यंदाच्या वर्षातील या पाच व्यापार करारामुळे याची जागतिक जीडीपीतील भागिदारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. २०२५ मध्ये भारातनं एकूण निर्णयातीपैकी २० टक्के निर्यात अमेरिकेला केली होती.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल फोनवरुन चर्चा केली. यानंतर भारतावरील टॅरिफ २५ टक्क्यांवरुन १८ टक्क्यांवर आणत असल्याचं जाहीर केलं. भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लावण्यात आलेले टॅरिफ देखील रद्द करण्यात येणार आहे. २०३० पर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार ५०० अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवण्याचं लक्ष आहे.
भारतानं काही दिवसांपूर्वी यूरोपियन यूनियन सोबत मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब केलं. 2007 पासून यूरोपियन यूनियन सोबत मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरु होती.
