मोदींनी देश अमेरिकेला विकला!
राहुल गांधींची व्यापार करारावरून मोदींवर टिका टीका
नवी दिल्ली : अमेरिकेबरोबर भारताने केलेल्या व्यापार करारावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टिका केली. पंतप्रधान मोदी घाबरलेले आहेत. जो व्यापार करार चार महिन्यांपासून रखडला होता, त्यात काहीच बदल न करता स्वाक्षरी केली गेली आहे. जे मला माहीत आहे, ते पंतप्रधान मोदींनाही माहीत आहे. पंतप्रधानांनी काल सायंकाळी करारावर स्वाक्षरी केली. त्यांच्यावर खूप दबाव आहे. या दबावापोटीच मोदींनी देश अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना विकला आहे अशा शब्दात राहुल गांधी यांना माध्यंमांसोमर आपला संताप व्यक्त केला.
“भारतातील शेतकऱ्यांच्या घामाला पंतप्रधान मोदींनी विकले आहे. त्यांनी फक्त शेतकरी आणि सामान्य लोकांना नाही तर देशालाही विकले आहे. यासाठीच मला सभागृहात बोलू दिले जात नाही. पंतप्रधान मोदी घाबरलेले आहेत. कारण ज्या लोकांनी त्यांची प्रतिमा तयार केली होती, ती भंग पावली आहे.”, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले.
“पंतप्रधान मोदींवर कोणता दबाव आहे? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता राहुल गांधी म्हणाले, गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेत खटला दाखल आहे. हा खटला अदाणींना लक्ष्य करत नाही. तर तो पंतप्रधान मोदींच्या आर्थिक ढाच्याला लक्ष्य करत आहे. दुसरा विषय एपस्टीन फाईल्सचा आहे. त्यात अजून बऱ्याच गोष्टी आहेत. बराच भाग अजून प्रसिद्ध झालेला नाही. अदाणींवर असलेला खटला हा मोदींवरचा खटला आहे”, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.
