चिमुरडींच्या मुत्यूमुळे देश हादरला ० ऑनलाइन गेमच्या व्यसनातून उचलले टोकाचे पाऊल? ० इमारतीच्या नवव्या मजल्यावरून ऊडीमारून मुलींची आत्महत्या ०

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) : गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटी परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. व्हिडीयो गेमच्या व्यसनातून तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय. या तिन्ही बहिणी कोरियन लव्ह हाँ ऑनलाइन गेम खेळण्याच्या व्यसनाधीन होत्या आणि त्याच कारणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाखी(१२), प्राची (१४) आणि विशाखा (१६) यां अल्पवयीन मुलींनी हे टोकाचे पावूल उचलल्याने देशभरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही मुली नियमितपणे ऑनलाइन गेम खेळत असत. घरात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘कोरियन लव्ह गेम’ असा उल्लेख आढळून आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, मुलींनी लिहिलेल्या पत्रात आई-वडिलांना उद्देशून, “मम्मी आणि पप्पा, सॉरी… आता तुम्हाला समजेल की आमचं या गेमवर किती प्रेम होतं,” असे नमूद करण्यात आले आहे. वडील हे शअर ब्रोकर आहेत. घरात त्यांची आई आणि मावशीही रहात होत्या.

या घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून, आत्महत्येमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे. तसेच, बालसुरक्षा तज्ज्ञ आणि सायबर गुन्हे शाखा या ‘कोरियन लव्ह गेम’सह संबंधित ऑनलाइन प्लॅटफॉर्मची माहिती घेत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, असे गेम मुलांचे भावनिक शोषण करण्यासाठी डिझाइन केलेले असू शकतात, ज्यामुळे अल्पवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

कोरोनानंतर या बहीणींना या गेमचे अधिक व्यसन लागले होते. त्यांनी शाळेत जाणेही सोडले होते. आणि बहुतांश वेळ त्या स्वताला घरात कोंडून घ्यायच्या अशी माहीती आता पुढे आली आहे. अनेकदा त्यांच्या वडीलांनी हा गेम मोबाईलमधून डिलीटही केला होता.

पालकांनी मुलांच्या ऑनलाइन सवयींवर लक्ष ठेवावे, त्यांच्याशी संवाद वाढवावा आणि कोणतीही असामान्य वर्तणूक दिसल्यास तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

चौकट

कोरियन लव्ह’ गेम म्हणजे काय?

हा गेम कोरियन पॉप कल्चर (के-पॉप), के-ड्रामा आणि व्हर्च्युअल डेटिंगच्या संकल्पनेवर आधारित असून, मोबाइल अॅप्स आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध आहे. या गेममध्ये खेळाडूंना ‘व्हर्च्युअल लव्हर’ किंवा अज्ञात वापरकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी दिली जाते. सुरुवातीला रोमँटिक मेसेजेस, चॅटिंग आणि मैत्रीपूर्ण संभाषणांद्वारे विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर दररोज काही टास्क दिले जातात, ज्यात सतत चॅट करणे, स्वतःचे फोटो पाठवणे, वैयक्तिक माहिती शेअर करणे किंवा ठराविक वेळेत मेसेज पाठवणे अशा गोष्टींचा समावेश असतो. कालांतराने हे टास्क अधिकाधिक वैयक्तिक आणि धोकादायक होत जातात. काही प्रकरणांत खेळाडूंना स्वतःला इजा करून घेण्यास प्रवृत्त केले जाते आणि शेवटचा टास्क आत्महत्येशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या गेमची रचना ‘ब्लू व्हेल’ चॅलेंजसारखी असून, सुमारे ५० टास्कनंतर शेवटच्या आत्महत्येच्या टप्प्यावर पोहोचवले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *