मोदींचा राज्यसभेतून काँग्रेसवर घणाघात

नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख नरवणेंच्या पुस्तकावरून लोकसभेत गदारोळ सुरु असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आपल्या भाषणात कांग्रेसवर घणाघाती टिका केली. दरम्यान मोदींचे भाषण सुरू होताच विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर विरोधकांनी वॉकआऊट केले.

‘मोहब्बत की दुकान खोलने वाले मोदी तेरी कब्र खुदेगी के नारे लगा रहे हैं. ही कोणती मोहब्बत काँग्रेस दाखवित आहे असा सवाल करीत काँग्रेसकडून वारंवार संविधानाचा अपमान होतोय असा आरोप मोदींनी केला.

जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जगातील ६ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. मात्र, काँग्रेसने देशाची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावर नेऊन ठेवली होती. काँग्रेसमुळे देशाची जी प्रतिमा बनली होती, ती प्रतिमा पुसण्यातच आपली अधिक मेहनत खर्ची होत असल्याचे मोदींनी म्हटले.

भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या ट्रेड डीलवरुनही मोदींनी भारताची जगभरात वाढत असलेली ताकद सांगितली. देशातील तरुणाईला या ट्रेड कराराचा सर्वाधिक लाभ होणार आहे. भारतातील प्राध्यापकांनाही जागतिक स्तरावर नवीन संधी उपलब्ध होतील,असे मोदींनी सांगितले. काँग्रेसने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. देशात १० कोटी असे शेतकरी आहेत, ज्यांकडे २ एकरपेक्षा कमी जमीन आहे. काँग्रेसने या शेतकऱ्यांकडे कधी पाहिलंच नाही, केवळ बड्या लोकांना सोबत घेतलं म्हणजे झालं अशीच काँग्रेसची भूमिका होती, असेही मोदींनी ससंदेत म्हटले.

कांग्रेससहीत सर्व विरोधकांची प्राथमिकता देश नव्हे, तर स्वतःचा खिसा भरण्याची आहे. आर्थिक असमानतेवर बोलणाऱ्या काही विरोधी खासदारांवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, जे स्वतःला राजा म्हणवून घेण्यात अभिमान बाळगतात, ते आर्थिक विषमतेची भाषा करतात, हे दुर्दैवी आहे. सरकारने ‘फ्यूचर रेडी पॉलिसीज’ राबवल्यामुळे देश आज रिफॉर्म एक्सप्रेसवर धावत आहे, असे त्यांनी म्हटले. म्हणूनच आम्ही अमेरिका आणि युरोपियन युनियनसोबत करार करू शकले असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *