अजित पवारांच्या अपघातामागे
पार्थसहीत तटकरे, पटेलांचा हात?
अंजली दमानियांच्या वक्तव्याने खळबळ
मुंबई : घरातील पाळीव कुत्रा मेला तरी आपण दुखावटा पाळतो, येथे महाराष्ट्राच उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धक्कादायक अपघाती निधन झाल्यानंतर ज्या पद्धतीन प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांनी शपथविधीसाठी सुनेत्रा पवार यांना तयार केले ते पाहता या अपघातामागे या तिघांचा हात तर नाहीना असा संशय मला येतो अशी धक्कादायक शंका अंजली दमानियाने व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादीने दमानियांविरोधात कायदेशीर करवाई करण्याचा इशारा दिला आहे.
आज पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांनी भाजपासहीत अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर टिका केली. पार्थ पवार हे मुंढवा जमीन विक्री भ्रष्ट्चारात दोषी असून प्रसंगी मी त्यांना क्लीनचीट मिळाल्यास न्यायलयातही जाईन असे आज जाहिर केले. दरम्यान, अंजली दमानिया यांना अनेक कपोलो कल्पित कथा सांगायची सवय आहे. अंजली दमानिया यांची आजची पत्रकार परिषद ऐकून समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृती असू शकते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली. एखाद्या व्यक्तीला आणि एका कुटुंबाला अंजली दमानिया सातत्याने बदनाम करत असतात. यापूर्वी देखील अंजली दमानिया यांनी अजित पवारांवरती अनेक आरोप केले, पण त्यातला कुठलाही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. आता त्या पार्थ पवार यांच्यावरती आरोप करत आहेत. ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे असे चाकणकर म्हणाल्या. ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे. अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
