अशोक गायकवाड
रायगड : मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत जप्त केलेली रोख रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती स्थापन करण्यात आली आहे. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह अध्यक्ष, राहुल केशव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी – निमंत्रक, देविदास टोंगे, जिल्हा कोषागार अधिकारी सदस्य यांचा समावेश आहे.
जप्त केलेली रोख रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने ३२-रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांची भरारी पथकाने जप्त केलेली रोख रक्कम परत करण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, राहुल केशव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी – निमंत्रक, देविदास टोंगे, जिल्हा कोषागार अधिकारी सदस्य. ही समिती उमेदरावांच्या जप्त केलेल्या रकमेचा कोणत्याही उमेदवाराशी किंवा राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याही निवडणूक प्रचार, इत्यादीशी संबंध नाही असे दिसून आल्यास अशी रोख रक्कम ज्यांच्याकडून जप्त करण्यात आली होती, अशा व्यक्तींना देण्याबाबतचे वस्तूनिष्ठ मौखिक आदेश दिल्यानंतर ही रक्कम उमेदवारास परत करण्याची कार्यवाही करेल.
