श्री माँ विद्यालयात आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग्ज स्पर्धा संपन्न

ठाणे : श्री माँ विद्यालय, ऑफ घोडबंदर रोड, पातलीपाडा, ठाणे (पश्चिम) येथील श्री माँ स्टेडिअमच्या भव्य प्रांगणात एकविसावी आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठाणे परीसरातील बहुसंख्य विद्यालयांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली होती. या स्पर्धेत नामांकित शाळांनी चित्रकलेतील निपुण विद्यार्थी स्पर्धेसाठी पाठविले होते. चित्रकला स्पर्धेत विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी रंगी-बेरंगी चित्र चितारुन आपले कौशल्य प्रकट केले. तसेच सुंदर पोस्टर पेंटिंग सादर केलेत.

या स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाना १०००, ८५०, ७०० रोख रक्कमेची बक्षीसे आणि ३०० रु. ची प्रोत्साहनात्मक १० बक्षीसे देण्यात आलीत. या स्पर्धेसाठी २२ शाळांमधील जवळ जवळ १४०० मुलांचा सहभाग होता. या कार्यक्रामात श्री माँ ग्रुफ ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन श्री बालगोपाल, श्रीमती चित्रा अय्यर, प्रिन्सीपॉल श्रीमती मिनी नायर, श्रीमती मेघना वांगे, श्रीमती रमा अनंतरामन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *