महापौर हर्षाली चौधरी यांच्या प्रयत्नाने अटाळी येथे रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात

पदभार स्वीकारून दोनच दिवसातच रस्त्याचे काम झाले सुरू

कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून (मूलभूत सोयी-सुविधा अंतर्गत) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पॅनल क्रमांक ३ मध्ये वाल्मीकी शाळा ते अटाळी गावापर्यंत नवीन डांबरीकरण रस्ता तयार करण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे.

दीर्घकाळापासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडी, खड्डे आणि पावसाळ्यात चिखल यांचा त्रास सहन करावा लागत होता. नव्याने करण्यात येणाऱ्या डांबरीकरणामुळे या सर्व समस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वडवली येथील उल्हास नदीवरील रस्त्याचे कामही पूर्णत्वाकडे जात असल्याने परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे. महापौर पद मिळताच अ प्रभाक्षेत्रातील सोयी सुविधांना पालिकेतील अधिकाऱ्यांनी सुरुवात केली असून महापौर पदाची ताकद काय असते हे हर्षाली चौधरी यांनी दाखवून दिले आहे.

या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा श्रीकांत शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच कल्याण पश्चिममचे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि माजी नगरसेवक शिवसेना उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला गती देण्यात आली आहे. महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांच्या अथक प्रयत्नातून व विशेष पाठपुराव्यामुळे निधी मंजूर होऊन हे काम प्रत्यक्षात साकारत आहे.

महापौर पद मिळताच अ प्रभाग क्षेत्रातील कामांना चांगली गती मिळाली असल्याने पॅनल क्रमांक ३ मधील नागरिकांना दिलासा मिळणार असून, शिवसेनेने दिलेल्या विकासाच्या वचनपूर्तीचा आणखी एक टप्पा पूर्ण होत असल्याची भावना स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *