पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी ठाणे महापालिकेची मोहीम तीव्र

१५ दिवसांत ९.८८ कोटींची वसुली

ठाणे: ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणी बिल थकबाकीदारांवर महापालिकेने कडक कारवाई सुरू केली असून गेल्या १५ दिवसांत (२० जानेवारी ते ५ फेब्रुवारी) प्रभाग समितीनिहाय मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान तब्बल ९ कोटी ८८ लाख १४ हजार ३४५ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.  या कारवाईत पाणीपुरवठा विभागाने थकबाकीदारांवर नळसंयोजन खंडीत करणे, नोटिसा देणे, पंप जप्त करणे आणि पंप रूम सील करणे अशा कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही मोहिम राबविण्यात येत असून ती सुरूच राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने नमूद केले.

या कारवाईत दिवा येथे ३१३ नळसंयोजन खंडीत करण्यात आली, २१ पंप जप्त तर ३४ पंप रुम सील करण्यात आले असून ३२४ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कळवा प्रभागसमितीत ७० नळसंयोजने खंडीत करण्यात आली. लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती १३४ नळसंयोजने खंडीत करुन एकूण ६०० जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मुंब्रा प्रभाग समितीत २३६ नळसंयोजने खंडीत, १८१ पंप जप्त करुन ४१ पंप सील करण्यात आले असून ३७३६ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नौपाडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत २४५ नळसंयोजने खंडीत करुन ३७० जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. उथळसर प्रभाग समिती हद्दीत ७१ नळसंयोजने खंडीत करण्यात आली. वर्तकनगर प्रभागसमितीत ४ नळसंयोजने खंडीत करुन २६ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर वागळे प्रभाग समितीमध्ये १ नळसंयोजन खंडीत करण्यात आले आहे.  एकूण १०७४ नळसंयोजन खंडीत करण्यात आली. तर २०२ पंप जप्त, ७५ पंप रुम सील करण्यात आले असून एकूण ५०५६ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

प्रभाग समितीनिहाय करण्यात आलेली  वसुली

माजिवडा मानपाडा  प्रभाग समिती : रु. २,१६,३२,८४२

नौपाडा कोपरी प्रभाग समिती :  रु. १,५७,५१,०१२

कळवा प्रभाग  समिती : रु १,२२,२७,२९२

वर्तकनगर प्रभाग  समिती रु.: १, १४,०७,८९३

उथळसर प्रभाग समिती रु. १,०९,८९,४९८

दिवा प्रभाग समिती : रु ७५,५४,३७५

लोकमान्य/सावरकर नगर प्रभाग समिती : रु ६९,७७,७३५

मुंब्रा प्रभाग समिती :  रु. ४८,६०,५७५

वागळे प्रभाग समिती :  रु. ५६,२३,५६४

याशिवाय नागरी सुविधा केंद्र व इतर माध्यमांतून रु. १७,८९,५५९ इतकी वसुली करण्यात आली. थकबाकीदारांविरुद्ध ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *