स्वाती घोसाळकर

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण सध्या रोज नवे वळण पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यातील राजकारणाचे सारे संदर्भ बदलले असून त्यामुळ विविध राजकीय पक्षांच्या भुमिकाही सातत्याने बदलत आहेत. येत्या २ एप्रिल रोजी महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या ७ खासदारांची राज्यसभेची मुदत संपत आहे. त्यात ऱाष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांचाही समावेश आहे. सक्रीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत देताना आपण यापुढे लोकसभा निवडणूक लढविणार नाही असे शरद पवार म्हणाले होते. आणि तसाच निर्णय आपण राज्यसभेबाबतही घेऊ असे म्हटले होते. पण अजित पवारांच्या निधनानंतर आता राज्यसभेच्या या जागेवर शरद पवार पुन्हा निवडणूक लडविणार असल्याची विश्वसनीय माहिती सुत्रांनी दिली आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार दुख विसरून बारामतीतील नीरा नदीच्या प्रदुषणाबाबत बारामतीकरांच्या समस्या जाणून घ्यायाल पोहचले होते ही बाबही लक्षणीय आहे. त्यातच सुनेत्रा पवारांच्या घरी सलग दोन दिवस शरद पवारांच्या झालेल्या बैठकीतून भावी राजकीय वाटचालीची दिशा दिसून येत आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते तर शरद पवारांच्या निवडीला काहीच अडचण नव्हती पण विधानसभेच्या बलाबलाचा विचार करता महाविकास आघाडीकडे फक्त एकच उमेदवार निवडून देण्याचे संख्याबळ आहे. तर भाजपा प्रणीत महायुतीचे सहा उमेदवार निवडून येऊ शकतात. त्याच चार भाजपा आणि एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांच्या पक्षाचा प्रत्येकी एक खासदार निवडला जाऊ शकतो.

निवृत्त होणाऱ्या राज्यसभा खासदारांत शरद पवारांसह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे डॉ. भागवत कराड आणि धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या फौजिया खान यांचा समावेश आहे. या सर्वांची मुदत संपल्यानंतर तातडीने नव्या निवडणुका होणार आहेत.

 विधानसभेतील सध्याच संख्याबळ पाहता राज्यसभेसाठी उमेदवाराला ३७. ५ मतांची गरज असणार आहे. पवार यांनी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या विधानात आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, दीड वर्षांनी राज्यसभेची मुदत संपल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी सूचित केले होते. महाविकास आघाडीतील सर्वात मोठा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे गट आहे. त्यामुळे संख्याबलानुसार या जागेवर त्यांचा दावा असणार आहे. परंतु आज ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या निवडीला पाठींबा दर्शिवला आहे.

राज्य विधानसभेचे सध्याचे संख्याबळ हे २८६ इतके आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. एक जागा निवडून येण्यासाठी ३७आमदारांचा कोटा असेल. सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे १६ आणि उद्धवसेनेचे २० असे तीन पक्षांचे मिळून ४६ आमदार आहेत. माकप आणि शेकापचे प्रत्येकी एक सदस्य आहेत.

मविआ एकत्र राहिली आणि या दोघांनी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर एक खासदार निश्चितपणे निवडून जाईल.

महायुतीची स्थिती खूपच मजबूत आहे. भाजपचे १३१, शिंदेसेनेचे ५७, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ४० असे मिळून २२८ आमदार आहेत. सात आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याने हे संख्याबळ २३५ इतके आहे. त्यामुळे त्यांचे सहा उमेदवार राज्यसभेवर नक्कीच निवडून जातील. भाजपने सातवा उमेदवार दिला तर चुरस होईल.

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला असला तरी पार्थ पवारांना पुर्ण ६ वर्ष असणाऱ्या राज्यसभेच्या खासदारकीसाठी तिकीट दिले जाईल. त्यामुळे पार्थ पवारांची उमेदवारी सुनेत्रा पवारांच्या पक्षाकडुन निश्चित मानली जात आहे. त्यामुळे शरद पवारांसाठी महायुती कंबर कसणार इतके नक्की.

photo caption

जेव्हा फोटोच सारे सांगून जातो…

अजित पवारांच्या घरी शरद पवार, रोहीत पवार आणि पार्थ पवार यांच्यातील हा संवाद खुप काही सांगून जातो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *