चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा
युवा खेळाडू विवांश घोषचे शानदार यश
मुंबई : नुकत्याच मरीन लाईन्स येथील विद्यापीठ क्रीडा संकुलात झालेल्या “चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो” स्पर्धेत युवा तायक्वांडोपटू विवांश घोषने शानदार यश संपादन केले. त्याने या स्पर्धेत ३ सुवर्ण, २ रौप्य पदकांची कमाई केली. सध्या तो दादर येथील बंगाली एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये ७व्या इयत्तेत शिकत आहे. गेली ५ वर्षे तो तायक्वांडो खेळांचे धडे गिरवत असून आतापर्यंत त्याने विविध स्पर्धांत ३० पेक्षा जास्त पदके मिळवली आहेत. विवांश “ब्लॅक बेल्ट”धारक असून त्याने आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत देखील प्रतिनिधित्व केले आहे. दादर येथील खेलो तायक्वांडो अकादमीत तो नियमित सराव करतो. राजेश मुराव हे त्याचे प्रशिक्षक आहेत. विवांशने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा नायडू यांनी त्याचे खास अभिनंदन केले आहे. भारताच्या माजी महिला कसोटीवीर,मुंबईच्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अरुंधती घोष यांचा विवांश हा नातू आहे.
