केडीएमसी आयुक्तांची शास्त्रीनगर रुग्णालयास अचानक भेट
रुग्णांची केली आपुलकीने विचारपूस
कल्याण:  कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शनिवारी सकाळी साडेआठ वाजता डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात दैनंदिन स्वरूपात केली जाणारी स्वच्छता, उपलब्ध औषध साठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा इत्यादी बाबींचा आढावा घेतला तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची आपुलकीने विचारपूसही केली.
यावेळी त्यांनी नवजात अतिदक्षता विभाग, बालरोग अति दक्षता विभाग या विभागांची तसेच इतर विभागांची देखील  पाहणी केली त्याचप्रमाणे रुग्णालयात चालू असलेल्या दुरुस्ती कामाची देखील पाहणी केली.  महापालिका रुग्णालयातील रुग्ण काही वेळेस तातडीने इतर रुग्णालयात संदर्भित करावे लागतात यासाठी एसओपी तयार करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांस दिल्या.
रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये केस पेपर काढण्यासाठी त्याचप्रमाणे अपघात कक्षात  रोकड रक्कम देऊन केस पेपर काढण्याच्या प्रक्रियेस लागणारा वेळ पाहता, केस पेपर काढण्यासाठी क्यूआर कोड आधारित  प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिले तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेमध्ये कुठल्याही प्रकारची हयगय काय होता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांना दिले.
यावेळी शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी  डॉ.सादिया पिंजारी, डॉ. विनोद दौंड, बालरोगतज्ञ डॉ. हेमराज देवरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *