प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात

अजित पवारांच्या अस्थींचे विसर्जन

प्रयागराज : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अस्थींचे प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात विधिपूर्वक भावपुर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी धार्मिक विधीनुसार संगमात अस्थी विसर्जन केले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
पवार कुटुंबीय चार्टर्ड विमानाने बारामतीहून प्रयागराजला पोहोचले. संगमाच्या व्हीआयपी घाटावर अस्थी विसर्जनाचा विधी पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कश्मीर ते कन्याकुमारी अशी अस्थी कलश यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा १२ राज्यांमधून मार्गक्रमण करून रविवारी संगमावर पोहोचली. जय पवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *