अरुळे ग्रामस्थांचे स्नेहसंमेलन उत्साहात
मुंबई : मौजे अरुळे ग्रामविकास मंडळ, मुंबईचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी शारदा मंगल कार्यालय, दादर येथे उत्सहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुभाष करपे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जगदीश भोवड उपस्थित होते.  यावेळी व्यासपीठावर मंडळाचे चिटणीस विकास खांबल, सुरेश रावराणे, सुभाष रावराणे, सहचिटणीस प्रकाश करपे, अजय वारीक हे उपस्थित होते. याप्रसंगी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सेवानिवृत्तांचा सत्कार, विजयी स्पर्धकांचे बक्षीस वितरण, हळदीकुंकू समारंभ आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले.
प्रमुख पाहुणे जगदीश भोवड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गावात शिक्षण घेऊन मुंबईला आल्यानंतर येथील आव्हाने स्वीकारत, मिळालेल्या संधीचे सोने करीत मी स्वतः जिद्दीने उभा राहिलो. आपल्या गावातील अनेक लोक असेच गरिबीतून पुढे आलेले आणि मोठे झालेले आहेत. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आपण सकारात्मक जीवन जगणे गरजेचे आहे. मंडळाचे अध्यक्ष सुभाष करपे यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता रावराणे आणि प्रभाकर रावराणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष करपे, विकास खांबल, देवकुमार बोडके, अजय वारीक, अनिल बाणे, मंगेश बाणे, जगदीश रावराणे, मधुकर खांबल, चंद्रकांत रावराणे, माधव काटे, प्रकाश करपे, मधुकर जैतापकर, नारायण खांबल, रमेश मराठे, चंद्रकांत खानविलकर, शांताराम खानविलकर, प्रभाकर रावराणे, नंदकुमार नारकर, प्रमोद नारकर, संतोष माईणकर, सुभाष जाधव, संतोष रावराणे, दिलीप जैतापकर, श्वेता रावराणे यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *