मन, मनगट, आणि मेंदू यांनी आपल्या मुलांना सक्षम बनवणे म्हणजे राष्ट्र उभारणीच – सुमेधा चिथडे
कल्याण : “मुलांवर आपण काय संस्कार करतो त्यांना काय शिकवतो ? इतिहास चुकीचा समजल्यामुळे भूगोल बदलायला लागला आहे. चुकीचं वागल्यास शासन झालेच पाहिजे. शासन झालं नाही तर अनुशासन काय पाळणार ? आम्हाला उपभोगाबद्दलच माहिती आहे पण त्यागाबद्दलचं काय ? आपल्या गरजा वजा केल्यास आयुष्य सुंदर आहे. मन,मनगट आणि मेंदू यांनी आपल्या मुलांना सक्षम बनवणे म्हणजे राष्ट्र उभारणीच.” असे परखड मत सुमेधा चिथडे यांनी कल्याण येथे व्यक्त केले.
रविवारी उज्वला मंडळातर्फे वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण पूर्ती निमित्त ऐतिहासिक कल्याणाच्या सुभेदार वाड्यात सुमेधा चिथडे यांचे “राष्ट्राय ईदम न मम” या विषयावर दृक श्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये राष्ट्रभावना निर्माण होण्यासाठी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तसेच गृहिणींना संपूर्ण वंदे मातरम शिकविण्यात आले असे मंडळाच्या अध्यक्ष सुनीता केळकर यांनी सांगितले. संपूर्ण वंदे मातरम गीत गायनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला. याचें सारख्या 18 हजार फूट उंचीवर -३५ डिग्री तापमान असलेल्या ठिकाणी सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारणाऱ्या चिथडे यांना कार्यक्रमात जमा झालेला निधीही देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *