श्री माँ विद्यालयात २५ वी आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धा संपन्न
ठाणे : श्री माँ विद्यालय, पातलीपाडा, ठाणे (प) यांच्या विद्यमाने ७ फेब्रुवारी दिवशी आयोजित केलेल्या २५ व्या आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेचे व शालांतर्गत प्रदर्शनाचे उद्घाटन श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे चेअरमन बालगोपाल यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी एफडीए महाराष्ट्रचे असिस्टंट कमिशनर योगेश ढाणे, छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण मुंबईच्या आरोग्य अधिकारी एम महेश्वरी, ठाणे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम तसेच श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे सेक्रेटरी रमेश जोशी, विश्वस्त मिस मंजू तेजवानी, चित्रा अय्यर, प्रिन्सिपॉल मिनी नायर, व्हाईस प्रिन्सिपॉल मेघना वांगे आणि रमा अनंतरामन यांचीही उपस्थिती लाभली.
विज्ञान प्रकल्पासाठी विविध बुध्दीगम्य विषय देण्यात आले. विज्ञान प्रदर्शनासाठी ठाणे जिह्यातील २२ शाळांचा समावेश होता. आंतरशालेय ३० प्रकल्प, तसेच वार्षिक ४०० प्रकल्प आयोजित केले होते. इयत्ता पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी – दैनंदिन जीवनात बायोप्लास्टीकचा वापर, विज्ञान आणि स्वच्छ उपग्रह तसेच आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी – मानवतेसाठी तंत्रज्ञान, पर्यावरण पूरक भविष्यातील वाहतूक हे विषय देण्यात आले आहेत.
श्री माँ स्नेहदिप ट्रस्ट संचालित श्री माँ स्नेहदिप स्कूलच्या विशेष विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग दिला असून त्यांनी विविध विषयावरील शैक्षणिक साधनांवर तयार केलेल्या प्रकल्पांची मांडणी केली आहे. यावेळी उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थित प्रमुख पाहुणे विद्यार्थी व पालकांनी श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कौतुक करत आभार मानले तसेच श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने ही सर्वांचे आभार मानण्यात आले.
