१२०० कोटींची फसवूणक करणाऱ्या ‘बंटी-बबलीला’ गुंतवणूकदारांनी न्यायालयाच्या आवारातच घेरले

ठाणे : जादा परताव्याचे अमीष दाखवून गुंतवणूकदारांची  तब्बल १२०० कोटींची फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे असोसिएटेड प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांना आज त्रस्त गुंतवणूकदारांनी न्यायालयाच्या आवारतच घेरण्याचा प्रयत्न केला.

तब्बल ११ हजार गुंतवणूकदारांची तब्बल १२०० कोटी रुपयांची फसवणूक समीर नार्वेकर, अमित बालम, नेहा नार्वेकर यांच्या या कंपनीने केली. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सोमवारी आरोपींना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठाण्यात २०१९ मध्ये टीडब्ल्यूजे असोसिएटेड प्रा. लि. कंपनीचे संस्थापक संचालक समीर नार्वेकर, अमित बालम, नेहा नार्वेकर यांनी गुंतवणूकदारांसाठी विविध उपकंपन्या तयार केल्या होत्या. कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास शेअर बाजारात कंपनीला दरमहा १० टक्के नफा मिळतो. यातील ४ टक्के नफा संबंधित गुंतवणूकदाराला मिळतील असे अमीष गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले होते.

मागील वर्षभरापासून गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळणे बंद झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, कंपनीचे संस्थापक संचालक समीर नार्वेकर, अमित बालम, संकेश घाग, खारघरचे विभाग व्यवस्थापक सागर कदम, वागळे इस्टेट येथील विभाग व्यवस्थापक सौरव बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *