शरद पवारांची प्रकृती बिघडली,

पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने बारामतीहून पुण्यातील रूबी रूग्णालयात हलवण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे देखील त्यांच्या सोबत होते. शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर आहे.

शरद पवार यांना कफाचा त्रास होत असून श्वास घेण्यासही काही प्रमाणात समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे शरद पवार यांना तातडीने गोविंदबाग बारामती या ठिकाणाहून पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यात आलं.

शरद पवार यांना होणारा कफाचा त्रास रविवारी रात्रीपासून वाढला आहे, त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे असे त्यांचे पुतणे श्रीनिवास पवार यांनी सांगितले.

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर परवेझ ग्रँट म्हणाले की आमच्या डॉक्टरांचं एक पथक शरद पवार यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. काही चाचण्या करण्यात आल्या आहेत त्यानंतर औषधांचा दिनक्रम आणि प्रमाण ठरवता येईल.” शरद पवारांवर कर्करोगाची शस्त्रक्रिया २००४ च्या आधी झाली आहे. त्यांच्यावर अमेरिका आणि भारत अशा दोन्ही देशांमध्ये कर्करोगासंबंधीच्या काही शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या बारामती, मुंबई आणि पुण्यातील घरी दौरे करत होते. तर, राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी येत होते. त्याची दगदगही त्यांना झाली असावी असे सुत्रांनी सांगितले.

 दरम्यान, आज शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार रूबी रूग्णालयात पोहचले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *