क्रांतिकारी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महापौर हर्षाली चौधरी यांना निवेदन
आरती परब
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील पत्रकारांसाठी “पत्रकार विकास योजना” राबवण्या बाबत “क्रांतिकारी पत्रकार संघाच्या” वतीने महापौर यांना निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पत्रकार आपल्या मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत. पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकार हे लोकशाही टिकवण्यासाठी धडपड करत असतात. आपले जीवन जनतेसाठी समर्पित करून कार्य करत असतात, वेतन नसल्यामुळे या महागाईच्या जमान्यात पत्रकारांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे व पत्रकारितेतून कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी पुरेसा मोबदला मिळत नसल्याने कौटुंबिक परिस्थिती हलाकीची झाल्याने त्यांना त्यामध्ये जीवन जगावं लागतं आहे. तेव्हा वस्तुस्थिती समजून घेता सहानूभूतीपूर्वक पत्रकार विकास योजना राबवून सहकार्य करावे. प्रामुख्याने पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा विनामूल्य मिळाव्यात, ज्या पत्रकारांचे स्वतःच घर आहेत त्यांना महानगरपालिके तर्फे घर पट्टी माफ करणे, पालिकेतील रुग्णाल्यातून निशुल्क सुविधा मिळाव्यात, मेडिक्लेम, विमा, आरोग्य सुविधा देण्यात याव्या.
शासनाने पत्रकारांसाठी राबवलेले धोरण महानगर पालिकेने लागू करावे. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात पत्रकारांसाठी घरकुलासाठी/भुखंड योजना राबवण्यात आल्या आहेत. तत्कालीन आयुक्त आर. डी. शिंदे, यांनी सन २००८ च्या पत्रकार समारंभात सर्व पत्रकारांसाठी घरासाठी मनपा हद्दीत भूखंड उपलब्ध करून दिला जाईल असे सूचक विधान केले होते. त्यामुळे पत्रकारांसाठी घरकुल योजना किंवा गृह भूखंड योजना राबविण्यात यावी. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेऊन सुविधा, सवलती मिळतील अशा आशयाचे निवेदन संघटनेच्या वतीने महापौरांना देण्यात आले.
यावेळी, राष्ट्रीय अध्यक्ष – गुलाबचंद्र यादव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष – मधुकर वाल्हेकर, राष्ट्रीय सचिव – प्रमोद तांबे, पत्रकार – राजू काऊटकर, पत्रकार – दीपक इंगळे, यांनी निवेदन सादर केले. तसेच अधिक माहिती साठी आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण, उपमहापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शहर अभियंता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका उप आयुक्त सामान्य प्रशासन यांना प्रत रवाना करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *