घंटागाडी चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करा
महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनची मागणी
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत घंटागाडीवर कार्यरत असलेल्या चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करण्याची मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने केली असून याबाबत त्यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी थविल यांची भेट घेतली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत घंटागाडीवर कार्यरत असलेले ठोक पगारी जड वाहन चालक नियमितपणे आपले काम पार पाडत असतानाही त्यांचा १५ डिसेंबर पासून अद्यापपर्यंतचा पगार अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधित कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत तातडीने दखल घेऊन संबंधित ठोक पगारी जड वाहन चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करण्याची व्यवस्था करावी. तरोच, सदर कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली. यावेळी युनियनचे संघटक मच्छिंद्र सकट, कॉम्रेड उदय चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *