साळवा बलात्कार प्रकरणातील आरोपीस कठोर शासन करा
माकप व जनवादी महिला संघटनेची मागणी
अनिल ठाणेकर
ठाणे, साळवा येथिल बलात्कार प्रकरणातील आरोपीस कठोर शासन करा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनवादी महिला संघटनेने केली आहे.यावेळी माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य विजय गाभणे व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य नेत्या रेहाना शेख, उज्वला पडलवार, लता गायकवाड, संगीता गाभणे, रमेश देवरे, प्रकाश दांडेगावकर, रामा कंटाळे, रेणुका कंटाळे हे उपस्थित होते
कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे भूमिहीन कुटुंब मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करून आपले पोट भरते. पिडित कुटुंब भूमिहीन असून ९ वर्षाची मतिमंद मुलगी २ ऱ्या वर्गात शिकते, २८ तारखेला शाळेच्या दुपारच्या सुट्टीत ती खेळत असताना तिला ६९ वर्षाचा आरोपी संतुकराम आवटे यांने चॉकलेट चे अमिष दाखवून पीडितेला घरी बोलावून लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी येऊन रडत असल्याने आईने काय झाले विचारले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीचे आई वडील यांनी आरोपीच्या घरी जाऊन विचारले असता त्याने पीडित कुटुंबाला ५ लाख रुपये घे आणि घडलेला हा प्रकार कोणाला सांगू नका असे धमकावले आहे.त्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीच्या आई वडिलांनी मुलीला हॉस्पिटल मध्ये दाखल केले आणि पुढील उपचार चालू असून मुलगी सुखरूप असल्याचे निदर्शनास आले.कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक होऊन त्यास परभणी येथील कारागृहात पाठवण्यात आले आहे.८ फेब्रुवारी २०२६ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने पीडित मुलीच्या घरी जाऊन आई-वडिलांना धीर दिला आणि आरोपीला कडक शासन झाले पाहिजे या साठी प्रयत्न करण्याचे आश्वासण देण्यात आले तसेच पक्ष व महिला संघटना आपल्याला सोबत आहे असे सांगून पिडीत कुटुंबाचे सांत्वन केले.पिडीत कुटुंबाच्या पुढील पुनर्वसनासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी आणी लेकरांच्या शिक्षणासाठी शासकीय मदत मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कुटुंब भूमिहीन बेघर असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे हेही निवेदन लवकरच देण्यात येणार असून पीडित मुलीला न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याची भूमिका माकप व जमस ने घेतली आहे.
