तुर्भे विभाग अंतर्गत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभाग अंतर्गत धनपाल गोकुळ पाटील व श्रीम. मालती धनपाल पाटील, घर क्र. ५१८, सेक्टर – ५, सानपाडागांव, सानपाडा, नवी मुंबई, यांनी वरील नमुद पत्यावर प्रतयक्ष ठिकाणी स्थळपाहणी केली असता विनापरवानगी अनधिकृतरित्या ९.४० मी. x ५.० मी. मोजमापाच्या क्षेत्रफळामध्ये चौथ्या मजल्याचे (G+४) आर.सी.सी. स्वरुपाचे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते.
त्याअनुषंगाने, अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कारवाई करुन सदरचेअनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेलेआहे.
सदर मोहिम आयुक्त सो. यांचे आदेशान्वये अति. आयुक्त राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड, यांचे मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त, तुर्भे सागर मोरे, यांचे नियंत्रणाखाली तुर्भे विभागातील विनोद आंब्रे, कनिष्ठ अभियंता व इतर अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली आहे.
तसेच सदर मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार आणि अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक देखील तैनात ठेवण्यात आले होते. वरील अनधिकृत बांधकाम हटविण्याकरीता ४ इलेक्ट्रीक हॅमर, १० मजूर यांचा वापर करण्यात आला आहे. तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अनधिकृत बांधकामावर कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
