डब्ल्यूआयजीए बीपीजीसी महिला खुली हौशी गोल्फ स्पर्धा
पारोमिता मुखर्जी पहिल्या दिवशी आघाडीवर
मुंबई: बीपीजीसी लेडीज सेक्शन्स आयोजित सीपीपीच्या सह-प्रायोजित१४व्या डब्ल्यूआयजीए बीपीजीसी महिला खुल्या हौशी गोल्फ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी एव्हीटी टूरची अव्वल क्रमांकाची गोल्फपटू बेंगळुरूची पारोमिता मुखर्जीने ७८ गुणांसह आघाडी घेतली.
बीपीजीसी येथे सुरू झालेल्या स्पर्धेत पहिल्या दिवशी देशभरातील आघाडीच्या हौशी गोल्फपटूंनी चांगली कामगिरी केली. त्यात गोल्डन डिव्हिजनमध्ये पारोमिता हिच्यासह मुंबईची उमा मेनन आणि दिल्लीची सोनाल चौधरीने छाप पाडली. ८१ गुणांसह दोघीही संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत.
सिल्व्हर डिव्हिजनमध्ये पुण्याची पुनम कालरा ८५ गुणांसह आघाडीवर असून ज्युनियर खेळाडू वाणी मेनन (८६ गुण) तिच्या पाठोपाठ आहे.
पारोमिता पहिल्या नऊ होलमध्ये तीन पूर्ण केले. त्यानंतर आणखी पाच पूर्ण करत ७८ गुणांची कमाई केली.
ब्राँझ विभागात मुंबईच्या मुली सिंथिया संधू आणि मीनल सांडू यांनी अनुक्रमे ९६ आणि ९८ गुणांसह पहिले व दुसरे स्थान मिळवले.
तिन्ही विभागांमध्ये एकूण ९६ गोल्फपटू अव्वल पुरस्कारांसाठी रिंगणात आहेत.
ही स्पर्धा बीपीजीसी महिला विभागाच्या सततच्या वचनबद्धता आणि समर्पित प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे, ज्यांचे बारकाईने नियोजन आणि खेळाबद्दलच्या आवडीमुळे महिला गोल्फपटूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ तयार करण्यात मदत झाली आहे.
