ॲड. रमाकांत ओवळेकर चषक स्पर्धा
वसंत विहार विद्यालयाचा विजय
आयर्न ठाकूरची हॅट्रिक, विहान सरमळकर सामनावीर
ठाणे -मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने युनायटेड क्रिकेटर्स व सूर सुदान शौर्या स्वर संस्था आयोजित १४ वर्षा खालील मुलांसाठी ठाणे जिल्हा आंतरशालेय क्रिकेट सामना २०२५ -२६ साठीचा उद्घाटन सोहळा दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ उन्मेष खानविलकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या वेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कौन्सिल सदस्य संदीप विचारे, ज्येष्ठ कायदेतज्ञ गजानन चव्हाण, प्रशिक्षक व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. युनायटेड क्रिकेटर्स व सूर सुदान शौर्या स्वर संस्थे तर्फे कौशिक गोडबोले आणि डॉ. नम्रता ओवळेकर- राणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
ठाणे जिल्ह्यासाठी साठी १४  वयोगटातील सामने खूप वर्षाने सुरू करण्यात आल्याबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक व क्रिकेटपटू यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन व सामाना आयोजकांचे आभार मानले.
पहिली उपांत्य फेरीचा सामना वसंत विहार विद्यालय, ठाणे विरुद्ध के. सी. गांधी विद्यालय, कल्याण यांच्यात रंगला. के. सी. गांधी विद्यालयचा आयर्न ठाकूर याने या सामन्यात (८- १- २५- ४)हॅट्रिक घेतली. पण संघाने हा सामना गमावला. वसंत विहार संघाने २७.५ षटकात सर्व बाद १५० धावा केल्या. ३४.५ षटकात के. सी. गांधी विद्यालयाला १३४ धावा करत्या आल्या. वसंत विहार विद्यालयाचा विहान सरमळकर (७.५- २- २८- 3) याला सामनावीराचा खिताब मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *