सानपाडा येथे प्रीमियर लीग २०२६ क्रिकेट स्पर्धा संपन्न
नवी मुंबई : सानपाडा ८ क्रिकेट संघ आयोजित सानपाड़ा तरूणाईंची सर्वाधिक पसंतीचा बहुचर्चित “सानपाड़ा प्रिमियर लीग २०२६ “ चा सांगता समारंभ ८ फेब्रूवारी २०२६ रोजी संपन्न झाला. एकंदरित १५० खेळाडुमधून प्रत्येक संघात १४ खेळाडू अधिक एक आयकॉन खेळाडू लिलाव ( बोली )पद्धतीने विभागुन देण्यात आले होते, अशी माहिती समाजसेवक मारुती विश्वासराव यांनी दिली.
यंग एसपीएल स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख ५१ हजार रुपये (स्व. महेश तुकाराम मढवी स्मृतिचषक) तसेच द्वितीय पारितोषिक रोख ३० हजार रुपये व (स्वर्गीय मनोहर देवाराम भोईर स्मूर्तीचषक) होते. त्याचप्रमाणे ४0+ एसपीएल स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख ३१ हजार रुपये (स्व. जयदेव श्रावण पाटिल स्मृतिचषक) तसेच द्वितीय पारितोषिक रोख २५ हजार रुपये (स्वर्गीय विट्ठल बुधाजी दलवी स्मूर्तीचषक) होते.स्पर्धेचा शुभारंभ सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास कठाले, वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय चव्हाण, नगरसेविका कोमल सोमनाथ वास्कर हयांच्या शुभहस्ते संपन्न झाला.तर संपूर्ण स्पर्धेदरम्यान शिवसेना नेते संसदरत्न खासदार मा.नरेश म्हस्के , उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, शहरप्रमुख विजय माने , उपशहरप्रमुख गणेश पावगे, मा. नगरसेवक काशिनाथ पवार , सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारूती विश्वासराव, माजी अध्यक्ष मारूती कदम, राष्ट्रपती पदक विजेते बाबासाहेब ढाकणे, सानपाडा गार्डन ७.५० ग्रुप, वरिष्ठ पोलिस निरिक्षक मा. कैलास डोंगरे, मा. मंडलिक , विभागप्रमुख विकास गाढवे, उपविभागप्रमुख संजय पाटिल, शाखाप्रमुख रणधीर सुर्वे,उमेश लोहोट, सामाजिक कार्यकर्त्ते सुरेश मढवी, ग्रामस्थ दिलीप मढवी, शत्रुघ्न पाटिल, बळीराम वास्कर , कमळाकर दळवी, सोपान ठाकुर, जनार्धन वास्कर, बबन ठाकुर, प्रभुदास म्हात्रे, डॉ. संजय लाड़ , काशीनाथ वास्कर, दत्ता वास्कर, नामदेव ठाकुर, रवी भाई हयांची प्रमुख उपस्थिती लाभली. पारितोषिक वितरण संसदरत्न ख़ासदार मा.नरेशजी म्हस्के, पोलिस निरीक्षक कुटे, प्रसाद महाडिक, विकास गाढवे, स्थानिक नगरसेविका कोमल वास्कर, शत्रुघ्न पाटिल ह्यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाला.यंग एसपीएल स्पर्धेचा अंतिम विजयी संघ पाल्म फाइटर तर उपविजेपते विधिशा चैलेंजर संघाने पटकावले. स्पर्धेतिल मालिकाविर ( स्वर्गीय लक्ष्मण अप्पा मढवी स्मुर्तीचषक ) व उत्कृष्ट गोलंदाज़ आकाश बनसोडे यांस स्वर्गीय श्रावणी विट्ठल शेट्टी स्मृतिचषकाने सन्मानित केले , व उत्कृष्ट फलंदाज़ स्वर्गीय रामदास बाला पाटिल स्मृतिचषक भरत वाढवल , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वर्गीय जयराम नथु पाटील स्मृती चषक ओमकार टोम्पे हे मानकरी ठरले. ४0+ सानपाडा प्रिनियर लीग २०२६ चे प्रथम पारितोषिक रोख ३१ हजार रुपये साठी स्वर्गीय जयदेव श्रावण पाटिल स्मूर्तिचषक विधी इंटरप्रायज़ेस हा संघ मानकरी ठरला तर प्रांजल इलेवन संघास उपविजेता पारितोषिक रोख २५ हजार रुपये व स्वर्गीय विट्ठल बुधाजी दळवी स्मूर्तिचषक देवुन गौरविन्यात आले. मालिकावीर – म्हणुन प्रकाश ठाकुर हा स्वर्गीय सदानंद बाळू पाटील स्मृतिचषकाचा मानकरी ठरला. उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय भालचंद्र दत्तु ठाकुर स्मृतिचषक इर्शाद दांडेकर , उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय छगन मोरेश्वर वास्कर स्मृतिचषक, मुकेश बाली उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वर्गीय बलिराम हिराजी पाटिल स्मृतिचषकावर किशोर जाधव हयांनी आपले नाव कोरले.प्रत्येक सामना सामनाविर म्हणुन बेबीबाई मधु पाटिल स्मृतिचषक बेबीबाई रमेश पाटिल स्मृतिचषक रेवती भालचन्द्र ठाकुर स्मृतिचषक वैशाली कलझुणकर स्मृती चषक अशोक शां. अंकुश स्मृतिचषक अनिल गव्हाणे स्मृतिचषक गणेश एकनाथ घोलप स्मृतिचषका सोबत विशेष पारितोषिक तसेच लकी ड्रा, मैदाना बाहेर झेल अशी अनेकानेक पारितोषिकाच्या लयलुट सोबत अंतिम फेरी विजेत्या मालीकास स्मार्ट टीव्ही भेट म्हणुन दिले गेले .सदर स्पर्धेनिमित्त गावदेवी मैदान सानपाडा येथे शेकडोंच्या संख्येंने क्रीडा प्रेमीनी सानपाडा प्रिनियर लीग २०२६ पर्व ९ वे करिता उपस्थिती दर्शविली. श्री सानपाड़ा ८ चे आयोजक भानूदास ठाकुर, निखिल पाटिल, संदेश दळवी , हेमंत दळवी, पवन मोढवे, मितेश दळवी, अरविंद ठाकुर , तसेच विशेष सहकार्य करणारे प्रल्हाद ठाकुर, शिवसेना विभाग प्रमुख आशिष वास्कर , रिद्धेश ठाकुर, प्रसाद गोन्दलेकर, सोमनाथ पाटिल, सागर देवकर, जयदीप पाटिल , श्री दत्त मित्र मंडल, ffc ग्रुप, वाडा बॉयज, १ नं ग्रुप, शिवसेना शाखा बॉयज यांचा सन्मान सानपाड़ा ग्रामस्त व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेच्या व्यासपीठावर एसपीएल खेळाडू प्रकाश ठाकुर, सुजय शेट्टी, आकाश बनसोडे, प्रवीण वास्कर हयांचा वाढ़दिवस केक क़ापुन साजरा करण्यात आला. तर क्रिड़ा रसिकांकरिता जेवण व्यवस्था हेमंत दळवी, किशोर वास्कर, सुरेश ठाकुर,विनोद पाटिल, केसरीनाथ ठाकुर, चिकन माया ट्रेडर्सचे माया ठाकुर,भाकरी सुविधा वासुदेव पाटिल हयांच्या वतीने करण्यात आली.
