शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत मिताली – घुफ्रान जेते
मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सारस्वत बँक पुरस्कृत १७ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरला २५-१४, २५-० असे सरळ आणि सहज दोन सेटमध्ये हरवून विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीच्या या सामन्यात घुफ्रानने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड ठेवली होती. तर महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मुंबईच्या मिताली पाठकने मुंबईच्या रिंकी कुमारीला २५-१२, २१-९ असे सहज पराभूत करून विजयावर आपले नाव कोरले. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या सागर वाघमारेला २५-०, २३-७ असे हरवले. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने बाजी मारली. तिने ठाण्याच्याच चैताली सुवारेला १७-१५, २५-११ असे सहज चीत केले.
प्रमुख अतिथी लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते विजेत्या खेळाडूंना चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शिवाजी पार्क जिमखान्याचे विश्वस्थ श्रीमती लता देसाई, प्रकाश नायक, महेंद्र ठाकूर, दीपक विश्वासराव, व्हाईस चेअरमन विश्वास नेरुरकर, सरचिटणीस संजीव खानोलकर, सह चिटणीस सुनील रामचंद्रन, इनडोअर खेळ सचिव सनिल समेळ, खजिनदार सी ए विलास सोमण, कार्ड सचिव अजय पाटणकर, कॅन्टीन सचिव आशुतोष जोगळेकर व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार आणि सहसचिव केतन चिखले व डॉ अनिल नेरुरकर उपस्थित होते.
पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे.
महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि सागर वाघमारे ( पुणे ) २५-१७, २५-२
अभिजित त्रिपनकर ( पुणे ) वि वि झैद अहमद फारुकी ( ठाणे ) २३-१९, २५-०
महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे.
रिंकी कुमारी ( मुंबई ) वि वि चैताली सुवारे ( ठाणे ) २५-२, २५-३
मिताली पाठक ( मुंबई ) वि वि समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) २५-१०, ५-२५, २१-८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *