अजित पवारांचा घातच झालाय
एअर हॉस्टेस पिंकी माळीच्या वडिलांचा आरोप
वैमानिकाला उशीर व्हायला मुंबईत सकाळी ६ वाजता कुठे ट्राफिक असतं?”
शेवटच्या क्षणी वैमानिकच नव्हेतर विमानही बदलले
मुंबई : अजित पवार यांचा विमान अपघात हा घातच होता असा आरोप आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहीत पवार यांनी करून २४ तास उलटत नाही तोच आता या अपघातात मृत्यू पावलेल्या एअर हॉस्टेस पिंकी माळीचे वडील शिवकुमार माळीनीही हा घातच असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
“पिंकीने चार वेळा अजित पवारांसोबत काळ्या आणि करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता. अपघाताच्या दिवशी मात्र पांढऱ्या रंगाचे विमान का दिले गेले?”, असा सवाल शिवकुमार माळी यांनी केला आहे.
अजित पवार ज्या विमानातून बारामतीला निघाले होते आणि ते अपघातग्रस्त झाले. त्या विमानाचा पायलट ट्रॅफीक जॅममध्ये अडकल्यामुळे ऐनवेळी बदलण्यात आला, असेही समोर आले आहे. त्यावर पिंकी माळी हिचे वडील म्हणाले की, “सकाळी ६ वाजता मुंबईतील कोणत्या भागामध्ये ट्राफिक असते. विमान अपघाताच्या दिवशी फक्त पायलट नाही, तर विमानही बदलले गेले होते होते”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याजवळ असलेले पुरावे सगळ्यांसमोर मांडण्याचे काम केले. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही हा घातपात असल्याचा संशय आहे“, असेही शिवकुमार माळी यांनी म्हटले आहे.
