शिवमंदिर स्मशानभूमी पुनर्बांधणीसाठी राहणार बंद
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली (पूर्व) विभागातील दत्तनगर येथील शिवमंदिर स्मशानभुमी (मोक्षधाम) ही जुनी स्मशानभुमी तोडून तेथे आधुनिक पध्दतीच्या नविन स्मशानभूमी प्रकल्पास महापालिकेने मंजुरी देऊन सन २०२४ मध्ये कार्यादेश प्रदान केलेला आहे. या स्मशानभुमीची पुर्नबांधणी करण्यासाठी, जुनी स्मशानभुमी तोडण्याचे काम रविवार १५ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शिवमंदिर स्मशानभुमीमध्ये फक्त गॅस शवदाहिनी सुरु राहिल, उर्वरित स्मशानभुमी संपुर्णपणे बंद राहील. तरी नागरीकांनी अंत्यविधीसाठी  डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा स्मशानभुमी, डोंबिवली पूर्वेतील ⁠पाथर्ली स्मशानभुमी, कल्याण रोड, आणि ⁠म्हसोबा चौक स्मशानभुमी, ठाकुर्ली या  स्मशानभुमींचा वापर करुन, महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *