पान दिवड सापाला मिळाले जीवदान
कल्याण : कल्याण पश्चिमेतील वाडेघर, पाणबुडी नगर येथे निर्माणधीन चाळीच्या मागील भागात पान दिवड जातीचा साप भक्ष्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत होता. स्थानिक नागरिकांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना फोन करून माहिती दिली ते तत्काळ दाखल झाले. बचावकार्य सुरू असताना त्यांना लक्षात आले की सापाच्या गळ्यात काहीसे धारदार जिववस्तू अडकली असून तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे परंतु असे झाले असते तर साप स्वतःच्या प्राणाला मुकला असता.
सर्पमित्र दत्ता बोंबे आणि हितेश करंजावकर यांनी वेळ न दवडता खाजगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रायभोले यांच्या क्लिनिक मध्ये धाव घेतली. डॉक्टरांनी एंडोस्कोप कॅमेरा मधून निश्चित केले असता सापाच्या गळ्यात मासाचे खवले अडकल्याचे निश्चित झाले. डॉक्टरांनी अल्पावधीत अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने वैद्यकीय उपचार करून अडकलेला भाग काढून सापाचा जीव वाचविण्यास मदत केली. उपचारानंतर पान दिवड सापाची काळजी घेऊन तथा शासकिय सोपस्कार पूर्ण करून निसर्ग मुक्त करण्यात आले.
