को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धेत आजपासून ३२ संघ झुंजणार

मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक टेनिस क्रिकेट स्पर्धेत राज्यातील ३२ सहकारी बँकाचे संघ अजिंक्यपदासाठी झुंजणार आहेत. युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ व सल्लागार माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वा. दादर-पूर्व येथील पुरंदरे स्टेडीयमवर स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

मुंबई शहर व उपनगरसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील को-ऑपरेटिव्ह बँकांचे टेनिस क्रिकेट संघ पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरले आहेत. परिणामी विजेतेपदाच्या दावेदारीसाठी मुंबई बँक, सांगली सहकारी बँक, रत्नागिरी बँक, मोगविरा बँक, ठाणे भारत सहकारी बँक, अपना बँक, मंत्रालय बँक, मालाड बँक, डेक्कन बँक, कोकण मर्कंटाइल बँक, जीएस महानगर बँक, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक, एस.टी. बँक, झोराष्ट्रीयन बँक, विमा कामगार बँक, वैश्य बँक, जनकल्याण बँक, ग्रेटर बॉम्बे को-ऑप.बँक, हिंदुस्थान बँक, नेव्हल डॉकयार्ड बँक, दमक जावळी बँक, अरिहंत बँक, एनकेजीएसबी बँक, मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग को-ऑप. बँक आदी सहकारी बँकांमध्ये चूरस राहील.

बाद पध्दतीने होणाऱ्या स्पर्धेतील पहिल्या ४ विजेत्या-उपविजेत्या संघांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक असून उत्कृष्ट क्रिकेटपटू, फलंदाज, गोलंदाज आदी वैयक्तिक पुरस्कार देखील दिले जाणार आहेत. उद्घाटनप्रसंगी युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर, नितीन गवादे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *