सुनेत्रा पवार १५ दिवसात राष्ट्रीय अध्यक्ष होणार !

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी  पक्षाचे रिक्त असलेले राष्ट्रीय अध्यक्षपदी येत्या १५ दिवसात सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

अजित पवारांच्या मृत्यूनंतर  चौथ्या दिवशीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार  यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांची महाराष्ट्र विधीमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळपासूनच पुण्यातील सर्किट हाऊस येते आल्या होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालानंतर विजयी झालेल्या सदस्यांच्या भेटीसाठी त्यांनी घेतल्या.यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांचे बंधू सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी येथे दाखल झाले होते. या बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार हेही उपस्थित होते. या बैठकीत अधिक वेळ न दवडता सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याबाबतचा निर्णय घेतला गेल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *