अभिनेते सुव्रत जोशी व अभिनेत्री शर्मिला शिंदे यांच्या उपस्थितीत व्हॅलेंटाईन डेला महा अनिसची युवा संकल्प अभियान परिषद’ संपन्न
अनिल ठाणेकर
ठाणे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जोडीदाराची विवेकी निवड विभाग व जोंधळे विद्यासमूह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा संकल्प अभियान समारोप परिषद’ १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेला सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत स. है. जोंधळे पाॅलिटेक्निक, डोंबिवली येथे पार पडली. अभिनेते सुव्रत जोशी व अभिनेत्री शर्मिला शिंदे यांची विशेष उपस्थिती हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते.

या ‘युवा संकल्प अभियान परिषद’ उदघाटन सत्राताचे प्रास्ताविक रेश्मा खाडे, राज्य कार्यवाह, जोडीदाराची विवेकी निवड विभाग यांनी केले तर, उदघाटक म्हणून नरेन्द्र चौधरी, मुख्य कार्रकारी अधिकारी, स. हैं. विद्यासमूह आणि प्रमुख पाहुणे नाट्य निर्माते आणि अभिनेते सुव्रत जोशी हे होते. महा. अंनिसचे राज्य अध्यक्ष माधव बावगे हे या सत्राचे अध्यक्ष होते. त्या नंतरच्या सत्रात “भिन्न लैगिकता आणि जोडीदाराची निवड” या विषयावर युतक फाउंडेशनचे अनिल उकरंडे आणि महा. अंनिसच्या राज्य सरचिटणीस आरती नाईक यांनी भाष्य केले. नंतरच्या सत्रात जोडीदाराची विवेकी निवड या विषयावरील परिसंवादात महेंद्र नाईक आणि तुषार शिंदे यांनी मांडणी केली, तर महा. अंनिसच्या राज्य निमंत्रित सुशिला मुंडे आणि सरचिटणीस विजय परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दिवसभर उत्साहात सुरु असलेल्या या परिषदेचा समारोपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री, नाट्य कलाकार असलेल्या शर्मिला शिंदे तर समारोप सत्राचे अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या मासिकाचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड हे होते, महा. अंनिसच्या ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ सुषमा बसवंत यांनी प्रास्ताविक केले. जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमातून नात्यातील सुरेल संवादासाठी वर्षभर संवाद शाळा सुरु असतात. १२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दरम्यान युवा संकल्प अभियान घेतले जाते, त्याची ही सांगता परिषद होती.

चौकट

जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमाला १० वर्ष पुर्ण झाली, म्हणून केक कापून हा आनंद उपस्थितांसोबत साजरा करण्यात आला. मान्यवरांसोबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य निमंत्रित प्रा. मच्छिन्द्र मुंडे, नंदकिशोर तळाशीलकर, राज्य कायदेविभागाच्या ॲड. तृप्ती पाटील, राज्य निधीसंकलन विभागाचे सुधीर निंबाळकर, राज्य युवा कार्यवाह प्रियांका खेडेकर, राज्य दस्तावेज विभागाचे अशोक निकम, ठाणे जिल्हा प्रधानसचिव राजेश देवरुखकर आणि कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या ठाणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष अनिल ठाणेकर, प्रधान सचिव अशोक मोहिते, दर्शना ढोके, छाया ठाणेकर, प्रमोद तामसे (ठाणे), मंगल मोरे (कल्याण), गौरी जाधव (कुर्ला) तेजल खेडेकर (पनवेल) हे कार्याध्यक्ष तसेच जोंधळे विद्यासमूहातील पदाधिकारी विजयश्री मोकाशी, सुदाम चव्हाण, डाॅ सरला गुप्ता, अर्जुन देशमुख, डाॅ मनिषा सावंत, डाॅ प्रशांत पाटील, निलेश बडवर आदींसह शेकडो विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे शहर, ठाणे, रायगड, मुंबई, नवी मुंबई या जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *