कल्याण रेल्वे स्टेशन परिसरास “रेड लाईट एरिया” घोषित करण्याची मनसेची मागणी
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वारांगनांचा वाढता वावर लक्षात घेता कल्याण स्टेशन परिसर रेड लाईट एरिया घोषित करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यत आली आहे. याबाबत मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि शाखा अध्यक्षा सोनल पवार यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेत निवेदन दिले आहे.
निवडणूकी दरम्यान पॅनल क्रं ९ मध्ये प्रचारासाठी फिरताना महिलांचे विषेश प्रश्न म्हणजे रेल्वे स्टेशन परिसरात महिलाचा दिवसांदिवस बिकट होणारे प्रश्न त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महापौर हर्षाली थवील चौधरी यांची मनसेच्या वतीने भेट घेण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिक क्षेत्रातील महिला रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या राहण्यास सुरक्षित नाही. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात दिवसाढवळ्या व रात्री महिला वारांगना व्यवसाय करणाऱ्या महिलांनी व्यापलेला असतो. सर्वसाधारण नागरिक महिला येथे उभे राहणे सुद्धा शक्य नसल्याने हा स्टेशन परिसर “रेड लाईट एरिया” घोषित करण्याची मनसेची मागणी आहे जेणे करून सर्वसामान्य महिला येथे उभे राहणार नाहीत. येत्या महिन्याभरात हे दृश्य असेच राहिले तर तेथे रेड लाईट एरियाचे फलक लावावे लागतील असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. महापौरांनी देखील या विषयाचे गांभीर्य समजून घेत लवकरात लवकर रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी करून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
