गेटवे ऑफ इंडिया येथे नृत्येश्वर संस्थेच्या वतीने सादरीकरण
कल्याण : सीआयएसएफ संरक्षण आणि सुरक्षा मंत्रालय आयोजित व महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात श्रीराम पांडे यांच्या सहकार्याने नृत्येश्वर संस्थेच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात ६० कलाकारां सोबत महाराष्ट्राच्या लोकनृत्यांच्या कार्यक्रम सादर करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शशिन मेस्त्री व सिद्देश मेस्त्री यांनी दिग्दर्शित केला होता. सहाय्यक म्हणून आशिष सोराप, अरविंद, सुधांशु, देवांग यांनी काम पाहिले. तसेच एसवीपी व लीलावती लालजी दयाल कॉलेज यांनी हि सहभाग घेतला.
